गेल्या तीन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. उपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र ते उपोषण करण्यावर ठाम आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. दीड वर्षांपासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठं वादळ निर्माण केलं आहे. आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत अनेक घडामोडी घडत आहेत.
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावली, उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोरू धरू लागली आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख उपोषणात सहभागी होत आहे.
मस्साजोग येथील महिला ही होणार आज उपोषणात सहभागी होत आहेत. आता सरकार बहुमताने आहे समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं उपोषणात सहभागी महिलांनी मागणी केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहेत. मी कालच मागणी केली आहे सरकार शिष्टमंडळ पाठवावं. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतलं पाहिजे लवकरात लवकर शिष्ट मंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे आईची तब्येत ठीक असेल तर आई पण सहभाग घेणार आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले.