राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून महाराष्ट्र तापणार असल्याची चिन्ह दिसतंय कारण मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा भूमिका तीव्र भूमिका घेतली आहे. जरांगेच्या या भूमिकेमुळे सरकार समोर आणखी एक पेच निर्माण होणार हे मात्र नक्की.
समोर आलेल्या माहितीनुसार , मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली आहे. मनोज जरांगे पाटील 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली. 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार. अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनासाठी 3 कोटी मराठे पुन्हा एकत्र येणार असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच या आंदोलनात 3 कोटी मराठे सामिल होतील असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
“मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. आपण अडीच-तीन वर्षापासून लढत आहोत. समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात ऍडमिशन आहेत. 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकार जळतंय, मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही ही सरकारची भूमिका आहे. सत्तेशिवाय नाही तर मराठ्यांशिवाय शहाणपण चालत नाही. आपल्या समाजाचा एवढा द्वेष का? भाजपमधल्या मराठ्यांच्या लेकीबाळीला आरक्षण लागणार नाही का? असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, आपल्याकडे रुपया नाही, पैशावाले आपल्यात येत नाहीत. मी प्रामाणिक आहे. आपल्याला वारंवार लढावं लागणार आहे. मुंबई तुम्ही विचाराने जिवंत केली. मुंबईतील लोक आम्हाला पुन्हा येणार का? म्हणून विचारतात. आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे. मी फडणवीसांना दोष देत नाही. तुम्ही हैदराबादचा GR काढला पण तुम्ही का रोखले? फडणवीस तुम्हाला मंत्री मराठ्यांनीच केलंय. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला फडणवीस साहेबच जबाबदार आहेत. फडणवीस साहेबांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं. मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत. याचा अर्थ तुम्हीच प्रमाणपत्र रोखले आहे.