“मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; जरांगे पाटील पुन्हा मैदानात”
“मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; जरांगे पाटील पुन्हा मैदानात”
img
Nandini khandare More




राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र  महाराष्ट्र तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राबाद गॅझेटनुसार ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांनी आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत “आपण जिकलो” अशी घोषणा देत जरांगे यांनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र आता मराठा आरक्षणासाठी अहोरात्र लढा देणारे मराठा आंदोलक पुन्हा एकदा आंदोलनाची मशाल पेटविण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय . 


याविषयी अधिक माहिती अशी की , फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नसल्याचे जरांगे म्हणाले. ज्या दिवशी तारीख निश्चित केली, त्यादिवशी आंदोलन होणार असल्याचे ते म्हणाले. 8 महिने उलटून गेले तरीही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का दिले नाही असा जळजळीत प्रश्न त्यांनी विचारला. समाजाच्या कल्याणासाठी आता आंदोलनाचा पर्याय असल्याचे ते म्हणाले. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी येथे ही बैठक होईल. त्यानंतर ते समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची भूमिका निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान , आज माध्यमांशी बोलताना मराठा समाज दिल्लीकडे कूच करण्याचे संकेत दिले आहेत. आजच्या  पत्रकार परिषदेत ते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group