महाराष्ट्रातील आणखी एका परीक्षेवर स्थगिती; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा
महाराष्ट्रातील आणखी एका परीक्षेवर स्थगिती; आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा
img
Nandini khandare More



पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांआधी नीट परीक्षा रद्द करून या परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे त्याच प्रमाणे आता राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा देखील रद्द करण्यात आली असून आता या परीक्षेची नवी तारीख करण्यात आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील रद्द करण्यात आलेली लेखी परीक्षा आता 24 मे रोजी घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्नांवरून निर्माण झालेल्या वादानंतर प्रशासनाने ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न हे एका खासगी प्रकाशकाच्या ‘पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ या पुस्तकातून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मागील परीक्षेमध्ये 100 पैकी तब्बल 85 प्रश्न हे विविध प्रश्नसंचांमधून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

विशेषतः एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या प्रश्नसंचातील प्रश्न थेट परीक्षेत विचारण्यात आल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणानंतर उमेदवार आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.  पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 4 मे रोजी सखोल चौकशीचे आदेश दिले. चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.

अप्पर पोलीस महासंचालकांनी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. वाद वाढल्यानंतर संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, 24 मे रोजी उमेदवारांची पुन्हा लेखी परीक्षा होणार आहे. या निर्णयामुळे परीक्षार्थींमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group