“मंत्रालयात खळबळ! संजय राठोड यांच्या कार्यालयातून मोठी चोरी”?
“मंत्रालयात खळबळ! संजय राठोड यांच्या कार्यालयातून मोठी चोरी”?
img
Nandini khandare More


सध्या राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता “मंत्रालयातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला गेले आहेत. 

 मंत्रालयात 10 हजारापेक्षा जास्त पैसे घेऊन जाता येत नाहीत. परंतु तरीदेखील मंत्रालयात संजय राठोड यांच्या कार्यालयात तब्बल 80 हजार रुपयांची रोख चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. संजय राठोड यांच्या कार्यालयात 80 हजार रुपये आलेच कसे? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपयांची चोरी झाल्याचे समोर येताच तेथील कर्मचारी आणि कार्यालयात ये जा करणाऱ्या इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. हा प्रकार समोर येऊ नये तसेच या चोरीची वाच्यता होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांकडून गयावया करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. सूत्रांनी तशी माहिती दिली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group