सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित
सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित
img
Dipali Ghadwaje
जालना : राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर बसले आहे. 25 जानेवारीपासून जरांगे पाटील हे अंतरवली सराटीमध्ये उपोषणावर बसले आहेत. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जालनामधील त्यांचे अंतरवली सराटी गावामध्ये हे उपोषण सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी सहा दिवसांच्या आमरण उपोषणानंतर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

खासदार बजरंग सोनावणे यांनी समजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे. संपूर्ण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान राज्य सरकारने त्याच्या एकूण आठ मागण्यांपैकी चार मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्याने जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group