माझ्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पत्रकार परिषद घेऊन मनोज जरंगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, माझे आणि त्यांचे काहीच वैर नाही. मागे मी मुंबईच्या आंदोलनात देखील सहभागी झालो होतो. मी एकही आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावर केला नाही. मनोज जरांगे पाटील यांना वाटते की, धनंजय मुंडे हा व्यक्ती पृथ्वीवरच राहू नये.
यासोबतच धनंजय मुंडे यांनी मोठा दावा करत म्हटले की, कट रचणारे कार्यकर्ते त्यांचे, बोलणारे कार्यकर्ते त्यांचे आणि आरोप माझ्यावर. माझे म्हणणे आहे की, या प्रकरणात पोलिसांना म्हणणे आहे की, या सर्व प्रकरणाची चाैकशी आता महाराष्ट्र शासनाने नाही तर सीबीआयने केली पाहिजे. माझी नार्काे टेस्ट करा, जरांगेची टेस्ट करा.
हे एकदा झाले पाहिजे, सत्य पुढे आले पाहिजे. उगाच एखाद्यावर आरोप करायचे? मुख्यमंत्र्यांच्या आईबहिणीवर बोलायचे. पंकजा ताईंबद्दल काहीही बोलायचे. आम्हाला पण वाटते की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता असेही त्यांनी म्हटले आहे.