मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर मोठी घोषणा, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ?
मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर मोठी घोषणा, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ?
img
वैष्णवी सांगळे
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यावर्षीच्या निवडणुकांमध्ये अनेक बदल पहायला मिळत आहे. बडे बडे नेते पक्षांतरे करत आहे. तर कुठे जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक होती ती एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत. त्यात आता आणखी एक मोठा बदल पहायला मिळणार आहे. 



परळी हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. भाजपाची एकहाती सत्ता परळीत राहिली. गोपीनाथ मुंडेही येथूनच निवडणूक लढवत. मात्र, धनंजय मुंडे एनसीपीत दाखल झाल्यापासून एनसीपीची ताकद वाढली. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच परळी हा मुद्दा राहिला आहे.आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्यानंतर आगामी निवडणुका परळीतून नक्की कोण लढणार यावरून सतत चर्चा होती.

नारायण राणे म्हणाले, मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो, पण…

नुकताच आता मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीबद्दल मोठे विधान केले. जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी म्हटले की, मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली… आता परळी धनंजय मुंडे सांभाळतात… मी परळी इतकेच माळाकोळीवर प्रेम करते. मी आता माळाकोळी सांभाळणार.. परळीवरचे प्रेम धनुभाऊंना करू द्या… मी त्यांना परळी देऊन टाकली. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या…

मी त्यांना म्हटले तुमचा मतदार संघ आहे तुम्ही प्रेम करा. मी आता माळाकोळीवर प्रेम करते. पंकजा मुंडे यांनी एकप्रकारे अत्यंत मोठे संकेत देऊन टाकले आहेत. माळाकोळीवर गोपीनाथ मुंडे यांचे विशेष प्रेम होते. आता पंकजा मुंडे यांनी माळाकोळीबद्दल मोठे विधान केले. यामुळे नवीन राजकीय समीकरणे बघायला आगामी काळात मिळू शकतात.
इतर बातम्या
Join Whatsapp Group