पंकजा मुंडेना जीएसटी विभागाचा मोठा दणका: वैद्यनाथ कारखान्याची 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त
पंकजा मुंडेना जीएसटी विभागाचा मोठा दणका: वैद्यनाथ कारखान्याची 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त
img
Dipali Ghadwaje
बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.  

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने ६ महिन्यांपूर्वी  एप्रिल महिन्यात छापेमारीची कारवाई केली होती. केंद्र सरकारचा जीएसटी कर थकवल्याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 

मात्र, आत्तापर्यंत भाजपविरोधी नेत्यांवर, विरोधी पक्षातील नेत्यांवरच ईडी, सीबीआयचे छापे पडत असतानाच भाजपच्याच नेत्याच्या कारखान्यावर कारवाई केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता पुन्हा एकदा जीएसटी विभागाने पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापेमारी करतानाच काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारी कारखान्याला यासंदर्भात नोटीस बजावली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यापूर्वीच युनियन बँकेने सील केला असून लिलावाची प्रक्रिया देखील सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

एकीकडे केंद्रीय सहकार विभागाने सहकारी साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचा आयकर माफ करुन मदत केली आहे. मात्र, याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जीएसटी विभागाने केलेली कारवाईवरुन राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत.



 

 

 
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group