आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे राजकीय बदलाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात भाजपमध्ये प्रवेशाची गर्दी असताना बीड मधून मात्र मोठी बातमी समोर आली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसणार आहे. गेली ३५ वर्षे मुंडे घराची साथ दिलेल्या पिता-पुत्रांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. बीड जिल्ह्याच्या वडवणी येथे बाबरी मुंडे आणि त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे यांचे मोठे वर्चस्व आहे. आणि आता याच पिता पुत्राने अजित दादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड जिल्ह्याच्या वडवणी येथील पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा मोठा प्रवेश सोहळा होणार आहे. येत्या 7 तारखेला खुद्द अजित पवार यांच्या हस्ते सोहळा पार पडणार आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.