पंकजा मुंडेंना राज्यसभेवर संधी? उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
पंकजा मुंडेंना राज्यसभेवर संधी? उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...
img
Dipali Ghadwaje
देशभरात राज्यसभेच्या रिक्त जागांवर येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण ५६ जागांसाठी मतदान होणार असून यापैकी सहा जागा महाराष्ट्रातील आहेत. दरम्यान राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडून कोणाला संधी मिळेल ही उत्सुकता असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे, अमरीश पटेल आदी नावे चर्चेत आहेत. याचदरम्यान पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. 

भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ६ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतले जाणार का? या चर्चांना उधाण आले होते. आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले  देवेंद्र फडणवीस 
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली होती का? याबद्दल प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. “पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group