बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंच वक्तव्य ; म्हणाल्या ,
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडेंच वक्तव्य ; म्हणाल्या , "…...तर आंनद झाला असता"
img
Dipali Ghadwaje
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव आलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी लावून धरली होती. अशातच बीडचा पालकमंत्री कोण होणार?

यासह बीडच्या पालकमंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा विरोध अशातच अखेर दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झाला.

यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा पत्ता या पदावरून कट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गळ्यात बीडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली. अशातच महायुतीतील नेत्यांमध्ये पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी असल्याची चर्चा होतेय. तर स्वतः पकंजा मुंडे यांनी यावर भाष्य केले आहे.

 पंकजा मुंडे ?

‘बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती तर आनंद झाला असता’, असं म्हणत बीडच्या पालकमंत्रीपदावरील प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला पालकमंत्रीपद मिळालं असतं तर बीडकरांना देखील आनंद झाला असता, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘मी बीडची लेक आहे. बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती, तर आनंद झाला असता. बीडकरांनाही खूप आनंद झाला असता.

माझा पाच वर्षांचा काळ हा बीडच्या इतिहासातील सर्वाधिक विकसनशील राहिलेला आहे. कोणत्याही विचारांचा व्यक्ती हे मान्य करेल. पण आता जे निर्णय झालेत. त्याबद्दल कोणतीही असहमती न दर्शवता आपल्याला जे मिळाले आहे. त्यात जास्तीत जास्त काम करण्याच्या भूमिकेत असणार आहे’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group