...म्हणून गडकरींच्या प्रचाराला जाणार नाही ; पंकजा मुंडेंनी सांगितले कारण
...म्हणून गडकरींच्या प्रचाराला जाणार नाही ; पंकजा मुंडेंनी सांगितले कारण
img
दैनिक भ्रमर
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. राज्यात भाजपने सर्वच बाबतीत आघाडी घेतली आहे. काही जागा वगळता भाजपने आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. आता राज्यासाठी 40 स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बीड लोकसभेच्या खासदार पंकजा मुंडे यांचेही नाव आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील जागांवर निवडणूक होणार आहे. याठिकाणी भाजपकडून नितीन गडकरींसह राज्यातील नेते मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकरी यांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नाचे उत्तर पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

'इंडिया' आघाडीच्यावतीने 'सेव्ह डेमोक्रेसी रॅली' ; 'या' नेत्यांची राहणार उपस्थिती

पंकजा मुंडे गडकरींच्या प्रचाराला जाणार नाहीत?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मोठे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्या प्रचाराला जाणार नाही. तेथे जाऊन त्यांचा आणि माझा वेळ उगीच वाया घालवणार नाही. सुधीर मुनगंटीवार यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत, असं भाजपच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. मात्र, मी स्वतः उमेदवार असल्यामुळे माझ्या मतदार संघात मी बारीक लक्ष देणार आहे. मात्र, बाकीचे उमेदवार व्हेंटिलेटरवर जातील अशी परिस्थिती येऊ देणार नाही, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडेंचा सरकारला घरचा आहेर

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर कामगार महामंडळा संदर्भात गेल्या पाच सात वर्षात आवश्यक असलेले काम झाले नाही असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला घराचा आहे दिला आहे. खूप भरीव काम करणे गरजेचे आहे. माझ्याकडे ते मंत्रिमंडळ होतं आणि माझ्याकडे पाच वर्षात कुठलीही जबाबदारी नव्हती. त्यामुळे ऊसतोड मजूर महामंडळ संदर्भात काही करता आले नाही, अशी खंतही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली. आगामी काळात जातीने लक्ष देऊन त्या संदर्भात काम करणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group