केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वायू प्रदूषणावर भाष्य करताना इथेनॉलवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करत असल्याचं सांगितले आहे. इलेक्ट्रिकच्या बसेसमध्ये काही अडचणच नाही, असे म्हणताना नितीन गडकरींनी नव्या प्रोजेक्टची माहिती दिली.
मुरलीधरजी मी आता नवा प्रोजेक्ट करतोय. टाटा कंपनीचं मी झेकोस्लोव्हिया येथे स्कोडा कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करुन दिलय. 18 ते 40 मीटरची ही बस आहे, ती बस जेव्हा बस स्टॉपवर थांबेल तेव्हा अर्ध्या मिनिटांत 40 किमीची चार्जिंग करेल.
बसमध्ये एक्झिक्युटीव्ह क्लास आहे, लॅपटॉप आहे. विशेष म्हणजे जसं एअर होस्टेस असतं, तसं बस होस्टेस असणार आहे. या बसमध्ये चहा-पानी, नाश्ता मिळेलच. पण, या बसचं तिकीट डिझेलच्या बसेसपेक्षा 30 टक्के कमी असणार आहे, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमातून दिली.
या इलेक्ट्रिक बसचा पहिला प्रोजेक्ट नागपूरला सुरू होत असून, त्यानंतर पुण्यातील रिंग रोडवर तुम्ही हा प्रोजेक्ट सुरू करा, असेही गडकरी यांनी मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून म्हटले.
आगामी काळात पुण्याला प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी इथेनॉलचा वापर करणाऱ्या या सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरू करण्याबाबत गडकरींनी मार्गदर्शन केलेय.