..... तर महाराजांचा पुतळा पडला नसता ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान
..... तर महाराजांचा पुतळा पडला नसता ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गतील राजकोट किल्ल्यावर असलेला शिवाजी महाराजांचा 28 फुटी ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. याबाबत विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आता एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

“सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कोसळला नसता,” असं गडकरी मंगळवारी म्हणाले. किनारपट्टी भागात गंज-प्रतिरोधक उत्पादने वापरण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला.

एफआयसीसीआयच्या एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून समुद्राजवळ बांधलेल्या पुलांच्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर करावा, यावर मी भर देत आहे. कारण मी मुंबईत 55 उड्डाणपुलांचे बांधकाम प्रकल्प हाती घेतले होते.

तेव्हा एका व्यक्तीने मला सोबत नेलं होतं. त्याने लोखंडी रॉड्सवर काही पावडर टाकली आणि ती गंज-प्रुफ असल्याचं सांगितलं होतं. पण, ती पावडर वापरूनही गंज चढला आहे. आता मला वाटतं की, समुद्रापासून 30 किमी अंतरावरील सर्व रस्त्यांवरील पुलांच्या बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर करणं गरजेचं आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच कोसळला नसता.” असं गडकरी म्हणाले

इतर बातम्या
Join Whatsapp Group