सध्याच्या वाहनांच्या किमती बघता कार घेणे हे सर्वसामान्यांच्या अवाक्या बाहेर आहे . त्यामुळे मध्यम वर्गीयांचे कर घेण्याचे स्वप्न बहुधा अपूर्णच राहते , पण आता वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे . कारण , कार बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते लक्झरी वाहन निर्मात्यांपर्यंत ऑटो कंपन्यांनी एक करार केला आहे. टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, आपण आपले जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी करत असाल, तर आपल्याल 1.5-3.5% पर्यंतची सूट मिळेल. खरे तर, यामागे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मोठी भूमिका आहे.
टीओआयच्या सूत्रांनुसार, काही टॉप लक्झरी कार कंपन्या जवळपास 25,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यास तयार झाल्या आहेत. इतर कंपन्याही या डिस्काउंटबद्दल एक मर्यादा निश्चित करतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान , ऑटो इंडस्ट्री आणि सरकार या योजनेची घोषणा करणार आहे. मार्च 2021मध्ये स्क्रॅपिंग पॉलिसी लागू केल्यापासून, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या गोष्टीवर भर देत आहेत, की खरेदीदारांना त्यांच्या जुन्या गाड्या स्क्रॅप करण्यासाठी डिस्काउंट आणि कमी जीएसटी यासारखी सूट मिळायला हवी.