लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांना वार्षिक टोल पास मिळणार आहे. नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 15 ऑगस्ट 2025 पासून वार्षिक फास्टटॅग पास सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये एक वर्ष किंवा २०० यात्रांवर ही पास वर्षभर वैध असणार आहे. पण ही पास गैरव्यवसायिक सर्वसामान्य वाहनधारकांसाठी असणार आहे. या पासचा लाखो वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शिवाय पैसे भरण्यासाठी लागलेल्या लांब रांगांपासूनही सुटका मिळणार आहे.
नितीन गडकरींची माहिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी वार्षिक फास्टॅग पास सुरु करणार असल्याचे म्हटले आहे. महामार्ग प्रवासाच्या दिशेने परिवर्तन करण्यासाठी पाऊल उचलले आहे. आम्ही १५ ऑगस्ट २०२५ पासून फास्टॅग पास सुरु करणार आहोत. हा पास ३००० रुपयांचा असणार आहे. हा पास सक्रिय झाल्यापासून १ वर्षासाठी किंवा २०० ट्रिपपर्यंत वैध असेल. आधी हा पास केवळ कार, जीप आणि व्हॅन अशा गैर व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी डिझाइन केला होता.
वार्षिक पास देशभरातली राष्ट्रीय महामार्गासाठी असणार आहे. याची ॲक्टिव्हेशन लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि HAI आणि MoRTH च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. हा नवीन पॉलिसी ६० किमीच्या आता असलेल्या टोल प्लाझांसाठी असणार आहे.
यामध्ये वार्षिक पासचा वापर करुन लाखो प्रवासी प्रवास करु शकणार आहात. कारचालकांना जलद आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.