SBIने तयार केली FASTag ची नवी डिझाइन ; काय आहे फायदे आत्ताच जाणून घ्या
SBIने तयार केली FASTag ची नवी डिझाइन ; काय आहे फायदे आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
सध्या अनेक वाहनधारकांकडे फास्टटॅग सुविधा आहे.फास्टटॅगमुळे अनेकदा टोल नाक्यावर रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यामुळे प्रवाशांना वेळ वाचतो. परंतु अनेकदा फास्टटॅग हे व्यवस्थित स्कॅन होत नाही. त्यामुळे कारचालकांचा बराच वेळ टोल नाक्यावरच जातो. त्यामुळेच आता स्टेट बँक ऑफ इंडियाने फास्टटॅगचे नवी डिझाइन समोर आणले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या FASTag साठी एक नवीन डिझाइन लॉन्च केले आहे ज्याचा उद्देश प्रवाशांचा प्रवास वेळ कमी करणे आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रेस रिलीझनुसार, "बँकेने SBI FASTag साठी व्हेईकल क्लास श्रेणीमध्ये एक नवीन डिझाइन सादर केले आहे . प्रगत FASTag डिझाइन वाहन ओळख आणि टोल वसुली कार्यक्षमता वाढवते ज्याचा उद्देश प्रवासाचा वेळ कमी करणे आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन फास्टटॅगमुळे टोल भरणे सोपे आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे फास्टटॅग लगेच स्कॅन होईल आणि कोणतीही अडचण येणार नाही. ही नवीन डिझाइन कार, जीप किंवा व्हॅनसाठी बनवण्यात आली आहे. यामुळे टोल देण्याची प्रोसेस आधीपेक्षा कमी होणार आहे.

SBI FASTag काय आहे? 

SBI FASTag हे एक डिव्हाइस आहे ज्यात रेडिओ फ्रिक्वेंसी ऑयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे टोलचे पेमेंट थेट प्रीपेड किंवा सेव्हिंग अकाउंटवरुन होणार आहे. हा फास्टटॅग कारच्या विंडस्क्रिनवर लावण्यात येणार आहे. 

यामुळे टोल नाक्यावर जास्त वेळ थांबावे लागणार नाही. टोल घेण्याची प्रोसेस अजून लवकर व्हावी, या उद्देशाने हे नवीन एसबीआय फास्टटॅग बनवण्यात आले आहे. हे नवीन फास्टटॅग ३० ऑगस्ट २०२४ पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे.

SBI फास्टटॅगचे फायदे

नवीन फास्टटॅग डिझाइनमुळे टोल भरणे खूप सोपे होणार आहे. टोलवर पेमेंट खूप कमी वेळात होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना जास्त वेळ टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. चुकीचा टोल चार्जच्या समस्या दूर करण्यासाठी हे नवीन डिझाइन मदत करेल. यामुळे टोल ऑपरेटर्सचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
इतर बातम्या
Join Whatsapp Group