केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. परंतु आता ही रक्कम वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना १२००० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेलील असलेल्या स्थायी समितीने शिफारसी सादर केल्या आहेत.
मंगळवारी १७ डिसेंबर २०२४ रोजी चरणजीत सिंह चन्नी यांनी ही मागणी लोकसभेत मांडली.पीएम किसान सन्मान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे. अहवालात म्हटले आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेची वार्षिक मर्यादा ६००० रुपयांवरुन १२००० रुपये करावी.
अर्थसंकल्पात निर्णय होण्याची शक्यता
पीएम किसान सन्मान निधी योजनेत देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींही अर्थमंत्र्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पान पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते.