केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी!  महागाई भत्त्यात
केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात "इतक्या" टक्क्यांनी वाढ , वाचा
img
Dipali Ghadwaje
केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रिय कर्मचारी आणि स्वायत्त संस्थाच्या कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता लागू होणार आहे. ज्यांना ५ व्या आणि ६ व्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो. त्यांच्याच महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक उपक्रम विभागाने निवेदन जारी केले आहे.

सहाव्या वेतन आयोगानुसार, पगारदार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता सध्याच्या २३९ टक्क्यांवरुन २४६ टक्के करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात ७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४३,००० रुपये आहे तर त्यात २३९ टक्के महागाई भत्ता वाढ होऊन १,०२,७७० रुपये मिळत असे. आता त्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे हा पगार १,०५,७८० रुपये होईल. म्हणजेच तुमच्या पगारात दरमहा थेट ३००० रुपयांनी वाढ होणार आहे.

५ व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्याचे दर ५ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सध्याच्या ४३३ टक्क्यांवरुन ४५५ करण्यात आला आहे. म्हणजेच महागाई भत्त्यात थेट १२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

७ व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ : ७ व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रिय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत ५० टक्क्यांवरुन ५३ टक्के झाली आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू झाली आहे.

महागाई भत्त्याचा लाभ कोणाला मिळणार? 

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिला जातो. निमशहरी, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने हे ठरवले जाते. केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्त्यात बदल केला जातो. यामुळे ५ व्या आणि ६ व्या आयोगांतर्गत पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा फायदा होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group