केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट...! 14 हजार कोटींच्या 7 निर्णयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट...! 14 हजार कोटींच्या 7 निर्णयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
img
Dipali Ghadwaje
केंद्र सरकारने आज महाराष्ट्राला मोठं गिफ्ट दिल आहे , त्या संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आज घेतलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्राने मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिलीय. केंद्राच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

आज पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांच्या दृष्टीने 7 महत्वाचे निर्णय घेतले. केंद्राने 13966 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना आज मंजुरी दिलीय. डिजिटल अग्रीकलचार मिशनसाठी 2817 कोटी रुपयांना मंजुरी केंद्राने दिलीय.  यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात बदल येईल. 

केंद्राच्या या मंजुरीनंतर शेतकऱ्यांना कर्ज घेणे सोपे होणार आहे. या बैठकीत बहुप्रतिक्षित मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आलीय. हा मार्ग ३०९ किलोमीटरचा असणार आहे. याचा JNPT पोर्ट सोबत कनेक्टिव्हिटीसाठी फायदा होणार आहे. 

यासोबत उत्तर महाराष्ट्रातील कांदा आणि सोयाबीन उत्पादकांना या मार्गाचा फायदा होणार आहे.  उत्तर महाराष्ट्रातील कांदा, सोयाबीन या पिकांच्या दळणवळणसाठी फायदा होणार आहे. 

दरम्यान जुलै महिन्यात मनमाड-इंदौर रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्वेला मंजुरी देण्यात आली होती. इंदौर-मनमाड ब्रॉडगेज या नवीन रेल्वे लाईन प्रकल्प मुंबई ते इंदौर थेट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मागास भागात सामाजिक-आर्थिक सुधारण्यास चालना देणारा ठरणार आहे.या रेल्वे प्रकल्पामुळे शेती उत्पादने, कार्गाची आयात-नियात इंदौर, देवास, रतलाम, पिथमपूर येथून मुंबई येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) पर्यंत होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group