खुशखबर...!  केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी दिवाळी भेट , पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?
खुशखबर...! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी दिवाळी भेट , पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?
img
Dipali Ghadwaje
सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. केंद्र सरकारनं मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी अ-राजपत्रित गट B आणि गट C कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस जाहीर केला आहे. यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस  म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाणार आहे. 

गट B आणि C गटात मोडणाऱ्या केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जातो. हे असे कर्मचारी आहेत, जे कोणत्याही प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस स्कीममध्ये समाविष्ट नाहीत. केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही चा लाभ मिळतो. याशिवाय हंगामी कर्मचारीही याच्या कक्षेत येतात.

कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या आधारावर कमाल मर्यादेनुसार, जी रक्कम कमी असले, त्या आधारावर बोनस जोडला जातो. 30 दिवसांचा मासिक बोनस सुमारे एक महिन्याच्या पगाराइतका असेल. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, जर एखाद्या कर्मचाऱ्याला 18000 रुपये मिळत असतील, तर त्याचा 30 दिवसांचा मासिक बोनस अंदाजे 17,763 रुपये असेल. कॅलक्युलेशननुसार, रु 7000*30/30.4 = रु. 17,763.15 (रु. 17,763).

केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या बोनसचा फायदा 31 मार्च 2023 पर्यंत सेवेत असलेल्याच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. 2022-23 या वर्षात किमान सहा महिने सतत ड्युटी केली आहे. एडहॉक बेसवर नियुक्त केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांनाही हा बोनस मिळणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी सलग सहा महिन्यांची सर्विस केलेली असावी, त्यांच्या सर्विसमध्ये कोणताही खंड असू नये, अशी अटकी घालण्यात आलेली आहे.  

मोदी सरकारकडून बोनस जाहीर 
पुढील महिन्यात दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन-प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या गट ब आणि गट क अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी , जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांनाही हा बोनस दिला जाईल. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दलातील सर्व पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group