केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन मिळणार ?
केंद्र सरकारची रॉकेल वाटपास मंजुरी; प्रत्येक कुटुंबाला किती लिटर केरोसीन मिळणार ?
img
वैष्णवी सांगळे
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताला देखील युद्धाचा फटका बसत आहे. भारतात गॅसटंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे गॅस एजन्सीमध्ये गॅस पुरवठ्याबाबत नियमावली तयार करण्यात आली असून व्यावसायिक गॅस पुरवठाही बंद करण्यात आला आहे. 



त्यातच, आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं असून केंद्र सरकारकडून 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपास राज्याला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय आवश्यक केरोसीन वितरण निश्चित केले असून मार्च-एप्रिल 2026 मध्ये राज्यात तिन्ही सरकारी तेल कंपन्यांकडून केरोसीन वाटप केले जाणार आहे. 

राज्यातील शिधापत्रिका धारकांना 3 लिटर केरोसीन मिळणार आहे. प्रति कुटुंब किंवा शिधापत्रिका असलेल्यांना एका शिधापत्रिकेमागे 3 लिटर केरोसीन मिळणार आहे. एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तात्पुरता स्वरुपात केरोसीन वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे. 

एकूण वाटपाच्या 85 टक्के केरोसीन पहिल्या पंधरवड्यात सोडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे, ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका आहे, त्यांना प्रत्येक कुटुंबास 3 लिटर केरोसीन मिळणार आहे. तर, ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसीन उपलब्धतेनुसार केरोसीन वितरणास पात्र राहतील. प्रतिसादाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिकाधारक देखील केरोसीन मिळण्यास पात्र असतील, अशी माहिती आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group