खासगी कोचिंग क्लासमध्ये 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश बंद: केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स
खासगी कोचिंग क्लासमध्ये 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रवेश बंद: केंद्र सरकारची नवी गाईडलाईन्स
img
Dipali Ghadwaje
खासगी कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन्स जाहीर केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशभरातील 16 वर्षांखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं. केंद्रानं आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं कोचिंग क्लाससाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षाखाली विद्यार्थ्यांची कोचिंग क्लासमध्ये नोंदणी करू नये, दिशाभूल करणारी आश्वासनं देऊ नये, चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही. अशी नियमावली जाहीर केली आहे. कोचिंग क्लासेसच्या संस्थांचे नियमन करण्यासाठी कायदेशीर चौकट गरजेचं असल्याचंही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

गाईडलाईन्समध्ये काय सांगण्यात आलं आहे?
गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, कोणतीही कोचिंग क्लासेसला पदवी नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करता येणार नाही. कोचिंग क्लासेस पालकांना विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी किंवा चांगली रँक मिळवून देण्याची किंवा चांगल्या गुणांची हमी देण्यासाठी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाहीत. क्लासेस 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकत नाहीत. 

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, आगीच्या घटना, कोचिंग क्लासेसमध्ये सुविधांचा अभाव तसेच त्यांनी अवलंबलेल्या शिकवण्याच्या पद्धतींबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारींनंतर मंत्रालयाने ही गाईडलाईन्स तयार केली आहेत.

"कोचिंग इन्स्टिट्यूटची एक वेबसाइट तयार करावी. ज्यामध्ये शिक्षकांची पात्रता (शिक्षण), अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी, वसतिगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क याची तपशीलवार माहिती असावी," असे गाईडलाईन्समध्ये म्हटले आहे. तसेच वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक दबाव कमी कसा करता येईल, यासाठी क्लासेसने पावले उचलली पाहिजेत आणि त्यांच्यावर अनावश्यक दबाव न आणता वर्ग चालवावेत, असंही गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group