संपूर्ण देशात 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे.
सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यविक्री होणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी हे आदेश जारी केले.
२२ जानेवारीचा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक नागरिक अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आलेल्या सर्व नागरिकांना यावेळी अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल असा दावाही योगी यांनी केला आहे.
22 जानेवारीला सर्व शासकीय इमारती सजवण्यात याव्यात.तसेच आतिषबाजी करण्यात यावी आणि अयोध्येत स्वच्छतेचे 'कुंभ मॉडेल' राबवावे असे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.