यवतमाळ : जिल्ह्यात शालेय पोषण आहारासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आलीय. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असणाऱ्या चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या आहाराच्या चॉकलेटचे वितरण करण्यात येत असून या मिलेट्स चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मिलेट्स चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या पौष्टिकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत होत आहेत.दरम्यान जस्ट युनिर्व्हसल कंपनीकडून पोषण आहार जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवला जातो. परंतु यवतमाळमधील पोषण आहारात अळ्या आढळून आल्याने कंपनीच्या गुणवत्तेवर प्रश्न केले जात आहेत.प्रशासन या कंपनीवर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.