बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड ; काय आहे नेमकं प्रकरण
बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड ; काय आहे नेमकं प्रकरण
img
Dipali Ghadwaje
बुलढाणा : देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर आला आहे. बुलढाणा येथे संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.

ऑनलाईन असलेली परीक्षा विद्यार्थी  परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु होता. मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेने  हा घोटाळा उघडकीस आला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. काल परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी अ‍ॅक्सेस घेतल्याचं दिसून आले. 
 
दरम्यान याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.   बुलढाणा जिल्ह्यात जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे? याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group