"या" ठिकाणी दोन गटांत राडा ; भाजपा युवा तालुका अध्यक्षासह 6 जण गंभीर जखमी ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच आता बुलढाण्यातील देऊळघाट गावात दोन गटांत तुफान राडा झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार , एका क्षुल्लक गोष्टीमुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे दोन गटात झालेल्या राड्यामध्ये भाजपचे युवा तालुकाध्यतक्ष नंदू लवंगे यांच्यासह इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

 देऊळघाट गावात अचानक दोन गट आमने-सामने आले. आमने-सामने आल्यानंतर दोन्ही गटातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी सुरु झाली. या राड्यामध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू लवंगे यांच्यासह इतर 6 जणांना मोठी दुखापत झाली आहे.

हाणामारीमध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान, या घटनेनंतर बुलढाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरु असल्याचं चित्र आहे.

देऊळघाट गावात ही घटना घडताच पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा दाखल होत परिस्थिती पूर्ववत सुरु केलीयं.

ही मारहाणीची घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. पोलिसांकडून या घटनेनंतर चौकशी सुरु आहे.

घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून उपचारादरम्यानच पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल होत जखमी नागरिकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या जबाबानंतर आता पोलिसांकडून दुसऱ्या गटातील नागरिकांची चौकशी सुरु आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group