३३ प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली ; कुठे घडली घटना? वाचा सविस्तर
३३ प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली ; कुठे घडली घटना? वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
रस्त्ये अपघातांच्या घटनानांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे, अशातच बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे . मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात झाला. समोरून भरधाव ट्रक येताना बसचालकाने बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट चिखलात रुतून उलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने अपघातात 5 प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.  

नेमकं काय घडले?

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. या बसमधून तब्बल 33 प्रवासी प्रवास करीत होते. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बस परडा गाव् फाट्या नजिकच्या वळणावर आली. त्याचवेळी समोरून सुसाट वेगाने ट्रक आला. या ट्रकला बघताच बसचालकाने बस थेट रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चिखल असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यावेळी बसमधील प्रवाशानी आरडा ओरड केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group