९ मे २०२६
नागराज मंजुळे यांचा २०१६ मध्ये प्रदर्शीत झालेला सैराट चित्रपट त्या काळी खुप गाजला होता. आता सैराट चित्रपटाट्या १० वर्षांनंतर आर्ची आणि परश्या पहिल्यांदा समोर आले असून रिंकूने शेअर केलेला तो फोटो व्हायरल होताच चाहत्यांमध्ये रिंकू-आकाशच्या लग्नाची चर्चा सूरू झाली. पाहा असे काय आहे त्या फोटोमध्ये? मराठी सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' सिनेमाला नुकतीच 10 वर्ष पूर्ण झाली. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
आर्ची आणि परशाची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती.100 कोटींची कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा म्हणून 'सैराट'ने इतिहास रचला. या सिनेमामुळे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रातोरात स्टार झाले. आता 'सैराट'च्या 10 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली. निर्मात्या आणि उद्योजिका उषा काकडे यांच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला.
या कार्यक्रमात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी हजेरी लावली होती. दोघांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अनेक वर्षांनंतर दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी रिंकू राजगुरूने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. तर आकाश ठोसर व्हाईट शर्ट आणि जीन्समध्ये कूल अंदाजात दिसला.रिंकू आणि आकाशने एकत्र धमालमस्ती करताना दिसले. दोघांना पाहून पुन्हा एकदा सैराटच्या आर्ची परश्याची आठवण झाली.
सोशल मीडियावर रिंकू आणि आकाश यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी रिंकू आणि आकाशला लग्न करण्याचा सल्लाही दिला. एका चाहत्यानं लिहिलंय, "तुम्ही दोघांनी आता लग्न करायला पाहिजे.दुसऱ्यानं लिहिलंय, तुम्हा दोघांचं आता शुभ मंगल सावधान. आणखी एकानं लिहिलंय, "विजय आणि रश्मिकासारखी ही मराठी जोडी पण खूप छान दिसते.तुम्ही दोघं लग्न करा".
काही चाहत्यांनी तर दोघांनी इंस्टाग्रामवर एकत्र रील्स बनवण्याची मागणी केली आहे. एका चाहत्यानं लिहिलंय, "तुम्ही दोघांनी इन्स्टावर रील बनवा म्हणजे आम्हाला तुम्हाला सतत एकत्र पाहता येईल." 'सैराट' रिलीज होऊन 10 वर्ष झाली असली तरी आर्ची आणि परशाची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. रिंकू आणि आकाशला पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या त्याचबरोबर दोघांच्या लग्नाची चर्चा होतेय.
Copyright ©2026 Bhramar