२ मे २०२६
मे महिन्याला सुरूवात झाली असून उन्हाच्या कडाक्यात वाढ होत आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या यलो अलर्टच्या यादित तुमचा जिल्हा तर नाही ना? तपासा आज 2 मे रोजी नागपूर जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळेत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिनांक 2 मे रोजी नागपूर जिल्ह्यासाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे तर, विदर्भातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण विभागात कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून किमान तापमान 24 ते 26 अंशांपर्यंत नोंदवले जाऊ शकते. मुंबई, रायगड आणि रत्नागिरी परिसरात दमट उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भागात कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या विभागात किमान तापमान 20 ते 24 अंशांच्या दरम्यान राहणार आहे. दिवसभर उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 39 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाऊ शकते.
किमान तापमान 22 ते 25 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. विदर्भ विभागात नागपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येथे कमाल तापमान 43 अंशांच्या आसपास पोहोचू शकते. अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ भागातही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात कमाल तापमान 38-41 अंशांच्या दरम्यान राहील. तर किमान तापमान 22-25 अंशांच्या दरम्यान असेल. उष्णतेचा पारा आणखी वाढण्याची शक्यता असून पावसाचा अलर्ट नाही. दरम्यान, राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असून कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Copyright ©2026 Bhramar