हिंदू धर्मात सण-वार संस्कृतीला सर्वाधीक महत्त्व दिले जाते. सर्व सण समारंभ मोठ्या उत्याहात आणि आनंदात साजरे केले जातात. ससेच हिंदू धर्मात इतर सणांप्रमाणेच वैशाख पौर्णिमा हा देखील महत्त्वाचा मानला जातो. वैशाख पौर्णिमा ही अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. यंदा 1 मे 2026 रोजी साजरी होणारी ही पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनात समृद्धी आणि भरभराटी आणणारी ठरू शकते. मात्र, शास्त्रानुसार या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले गेले आहे. असे मानले जाते की 'या' चुका केल्यास घरावरील लक्ष्मीची कृपा कमी होते आणि व्यक्तीला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्या आहेत या चुका जाणून घ्या.
तामसिक भोजन
पौर्णिमेच्या दिवशी सात्विक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी मांस, मद्य, लसूण किंवा कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन केल्याने मनातील एकाग्रता नष्ट होते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. असे केल्याने माता लक्ष्मी रागावते आणि घरात दरिद्रता येते.
राग आणि वाद:
पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे, जो मनाचा कारक आहे. या दिवशी घरातील वातावरण आनंदी ठेवावे. कोणाशीही वाद घालणे, ओरडणे किंवा अपशब्दांचा वापर करणे टाळावे. ज्या घरात कलह असतो, तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही, ज्यामुळे पैशांची चणचण भासू लागते.
केस आणि नखे कापणे:
शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे काढणे अशुभ मानले जाते. या क्रियांमुळे कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमकुवत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर होतो.
कर्ज व्यवहार
वैशाख पौर्णिमेला कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून कर्ज घेऊ नका. या दिवशी दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते आणि घेतलेल्या कर्जामुळे डोक्यावरील बोजा वाढतच जातो. आर्थिक व्यवहारांसाठी हा दिवस शुभ मानला जात नाही.
काळे कपडे परिधान करणे
पौर्णिमा हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे. शक्य असल्यास पांढऱ्या, पिवळ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. पांढरा रंग चंद्राचा प्रिय रंग असून तो जीवनात शांतता आणि समृद्धी आणतो.
उशिरापर्यंत झोपणे
या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जे लोक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर उशिरापर्यंत झोपतात किंवा दिवसा झोप घेतात, त्यांच्या आयुष्यात आळस वाढतो आणि प्रगतीचे मार्ग खुंटतात. लवकर उठून विष्णू नामस्मरण केल्याने नशिबाची साथ लाभते.