औषधाच्या गोळीवर 'ती' मध्यरेषा का असते? जाणून घ्या यामागचे रंजक कारण, जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
औषधाच्या गोळीवर 'ती' मध्यरेषा का असते? जाणून घ्या यामागचे रंजक कारण, जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
img
नितीशा कुलकर्णी





अनेकदा आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या औषधे घेतो. कधी कधी मेडीकल स्टोअर मधून देखील आपण गोळ्या औषधे घेतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? औषधी गोळीच्या मध्यभागी का असते रेषा? काय आहे या मागचे कारणं तुम्हाला माहित आहे का? औषधांविषयी अनेक लोकांना कमी माहिती असते.

औषधांवर विविध प्रकारचे रंग, निशाणी, खूना असतात. पॅकेटच्यामागील बाजूस असलेले शब्द कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे संकेत जरूर करतात. पण लोक अशा खुणांकडे दुर्लक्ष करतात.

औषधांविषयीची रंजक माहिती तुम्हाला माहिती आहे का? काही गोळ्यांच्या मध्यभागी एक रेष असते. असी रेष का देण्यात येते? काय होतो त्याचा अर्थ? आपण मेडिकलवर जाऊन डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घरी घेऊन येतो. यामध्ये काही लिक्विड तर काही गोळ्या असतात. या गोळ्या सुद्धा विविध रंगी असतात. या गोळ्या विविध आकाराच्या असतात.

काही गोल, काही लंबगोल, तर काही त्रिकोणीही असतात. पण यातील काही गोळ्यांच्या मध्यभागी एक रेषा असते. अर्थात ही काही डिझाईन नाही. तर तुम्ही किती प्रमाणात ती गोळी घ्यावी यासाठी केलेली खूण असते. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात तेव्हा वेगवेगळी वेळ आणि मात्रा सांगितली जाते.

काही गोळ्यांच्या मध्यभागी रेषा नसते. त्याचा अर्थ असा आहे की ही ती एक गोळी घ्यायची आहे, ती तोडायची नाही. उदाहरणार्थ डॉक्टरने एखादी गोळी दिली आणि तिचा 500mg डोज घ्यायचा सांगितला आणि ही गोळी 1000mg असेल तर तुम्हाला ती गोळी अर्धी करून घ्यायची आहे. ती संपूर्ण गोळी घ्यायची गरज नाही.

त्याचा अर्थ तुम्हाला ही गोळी मध्य भागातून तोडावी लागेल. त्यासाठी ही मध्य रेषा देण्यात आली आहे. अर्धी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी लागेल. थोडा जोर लावल्यास 1000 mg डोजची गोळी 500 mg च्या दोन बरोबर हिश्यात तुटेल

गोळीच्या मध्यरेषेला काय म्हणतात?

अनेक औषधी गोळ्यांच्या मध्यभागी एक थेट निशाण करण्यात येते. त्याला Debossed Line असे म्हणतात. या रेषेचा अर्थ की गोळी मधोमध तोडून ती घ्यायची आहे. अशा प्रकारचे निशाण त्याच औषधांवर असते ज्यांची क्षमता अधिक असते. ज्यांची पॉवर अधिक असते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी अशी रेष असलेली गोळी तुम्हाला देण्यात येईल, तेव्हा डॉक्टरांना ती गोळी अर्धी घ्यायची आहे का याविषयीची माहिती विचारून घ्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group