४ मे २०२६
उन्हाळ्याच्या तडाख्यात शरीराला गारवा देणारे आणि मनाला तृप्त करणारे फळ म्हणजे 'कलिंगड'. मात्र, अमृत समजून खाल्ले जाणारे हे फळ चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी खाल्ल्यास शरीरासाठी विष ठरू शकते. कापलेले कलिंगड फ्रिजमध्ये किती काळ टिकते आणि ते कधी खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे, याबद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती. तप्त उन्हात हायड्रेट राहण्यासाठी आपण कलिंगडावर ताव मारतो, पण रात्रीच्या वेळी याचे सेवन तुमच्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम करू शकते. तसेच, फ्रिजमध्ये उघड्यावर ठेवलेले कलिंगड जिवाणूंचे माहेरघर बनू शकते.
तुम्हीही कलिंगड प्रेमी असाल, तर हे फळ खाण्यापूर्वी 'या' काही खबरदाऱ्या नक्की घ्या, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. उन्हाळ्यात टरबूजाचा हंगाम असतो. भारतीय उन्हाळ्यात कलिंगडावर तुटून पडतात. बाजारात या काळात मोठ्या प्रमाणात कलिंगड येते. कलिंगडामुळे लागलीच ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून कलिंगड खाल्ल्याने बरे वाटते. कलिंगड गोड असल्याने अबालवृद्धांचे ते आवडते फळ आहे. उन्हाळ्यात कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवते. पण कलिंगड केव्हाही खाणे योग्य नाही. त्याने शरीराला अपाय होऊ शकतो. टरबूज कितीही किलोचे असले तरी ते एकदाच संपत नाही.
कापलेले उरलेलं कलिंगड नेमकं किती दिवस सुरक्षित राहते हे माहिती असणे आवश्यक आहे. एकदा कापलेले टरबूज हे योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवल्यास 3 दिवस चांगले राहु शकते. पण जितके लवकर ते संपणार तितके फायदेशीर मानले जाते. पण फ्रिजऐवजी तुम्ही ते माठाशेजारी ठेवले. बाहेरील वातावरणात ठेवले. तर साधारणता 2 तासातच ते संपवणे गरजेचे आहे. नाहीतर उष्णतेमुळे त्यात जिवाणू वाढू शकतात. जर टरबूज कापले आणि फ्रिज ठेवले तर त्याचा वास इतर भाजी अथवा दुधाला लागू शकतो. इतकेच नाही तर एखाद्यावेळी कापलेले टरबूज जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवून जर त्याचा रंग फिक्कट दिसत असेल अथवा त्याचा वास येत असेल अथवा ते आंबट लागत असेल तर मात्र ते खाणे योग्य नाही. शरीराला त्याने अपाय होऊ शकतो.
कलिंगड केव्हा खाऊ नये?
विशेष म्हणजे रात्री अथवा मध्यरात्री कलिंगड खाऊ नये. त्यामुळे आतड्यांना अपाय होऊ शकतो. मधुमेहींनी टरबूज जास्त खाऊ नये. त्यात नैसर्गिकरित्या साखर अधिक असते. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ खाऊ नये. तर ज्यांना कलिंगड खाल्ल्याने त्रास होतो, त्यांनी टरबूज खाऊ नये
Copyright ©2026 Bhramar