चांगल्या आरोग्यासाठी आहारात फळांचं सेवन करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. जे डोळे, केस, त्वचा सर्वासाठीच भरपूर फायदेशीर असतात. पण काही फळांच्या बिया देखील आपल्या शरीराला फार लाभदायी ठरतात. काही बियांमध्ये चांगल्या फॅट्सपासून ते प्रथिने आणि फायबरपर्यंत तसेच अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तर बियांचा उपयोग केवळ रोपे वाढवण्यासाठीच नाही, तर त्या चांगल्या आरोगयासाठी सेवन देखील करू शकतो. पण आपण ती मात्र फेकून देतो. चला तर मग उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या काही फळांच्या बियांबद्दल जाणून घेऊयात.
फणसाच्या बिया - फणसाच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेषतः उत्तर भारतात कच्चा फणसापासून भाजी बनवली जाते. पिकलेला फणसाच्या गऱ्याचे सेवन करतो. पण अनेकदा त्याच्या बिया फेकून देतो. पण या बिया देखील पोषक तत्वांचा खजिना आहेत. हेल्थलाइननुसार फणसाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि लोह असते.
कलिंगडाच्या बिया - कलिंगडाच्या बियांमध्येही भरपूर पोषक तत्वे असतात. जेव्हा कलिंगडाचे सेवन करत असतो तेव्हा त्यातील बिया फेकून देतो. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते कलिंगडाच्या बियांमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. तसेच त्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, मॅंगनीज, फोलेट आणि फॅटी ॲसिड्सचा देखील स्रोत आहेत.
खरबुजाच्या बिया - भारतीय घरांमध्ये अनेकदा खरबुजाच्या गरातून बिया काढून, त्या धुवून सुकवतात. त्यानंतर या सुकलेल्या बिया मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार , त्यात प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, पॉलीअनसॅचुरेटेड फॅट (चांगल्या प्रमाणात) आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड असतात.
जांभळाच्या बिया - उन्हाळा आणि पावसाळ्यात उपलब्ध होणारे जांभूळ हे फळ जवळजवळ सर्वांचेच आवडते आहे. हे हंगामी फळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे, परंतु त्याच्या बिया अनेकदा फेकून दिल्या जातात. मात्र यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी या जांभळाच्या बिया कितीतरी पटीने फायदेशीर आहे. कारण अनेक लोकं रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभूळ पावडरचे सेवन करतात. पबमेडनुसार जांभूळाच्या बियांमध्ये अँथोसायनिन आणि फिनोलिक संयुगे यांसारखे नैसर्गिक घटक असतात. त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि फ्लेव्होनॉइड्स देखील असतात.
टीप - दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर ही आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.