आजचे राशीभविष्य: सिंह आणि कुंभ राशींना लॉटरी, तर 'या' राशींनी आज जपून पाऊल टाकावे!
आजचे राशीभविष्य: सिंह आणि कुंभ राशींना लॉटरी, तर 'या' राशींनी आज जपून पाऊल टाकावे!
img
नितीशा कुलकर्णी













आपले राशीभविष्य जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. तूमचे आजचे राशीभविष्य काय आहे. मेष ते मीन राशी साठी आजचा सोमवार खास कसा ठरेल जाणून घ्या.

मेष- राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून अनेक चांगले बदल होतील. आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. एखादी नवीन सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या गडबडीत कुटुंबाला वेळ द्यायला विसरू नका.

वृषभ- राशीसाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस संधीनी भरलेला असेल. तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला चाखायला मिळेल. तुमच्या आत्मविश्वात वाढ होईल. आर्थिक बाजू देखील तुमची भक्कम असेल. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी समाधानकारक असणार आहे.

मिथुन- राशीसाठी आजचा दिवस चांगला असणारा आहे. जो काही गेल्या दिवसांपासून भावनिक गोंधळ जाणवत होता. तो दूर होईल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते सहकाऱ्यांना सोबत घेऊन चला . कामासोबत कुटुंबाला वेळ द्या.

कर्क- राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला आज भावनिक गोंधळ जाणवेल. तुमचं मन अस्थिर असेल याचा परिणाम तुमच्या कामावर देखील होऊ शकतो . त्यामुळे आज फोकस राहून कोणत्याही गोष्टीचा अति विचार न करता काम करा. जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवा.

सिंह- राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल . तुमच्या प्रमोशनची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यासाठी देखील आजचा दिवस उत्तम आहे. आज आलेल्या संधीचा फायदा घ्या. भविष्यात याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल.

कन्या-  राशीसाठी आजचा दिवस अनेक संधी घेऊन येणार असेल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ज्या संधीची वाट पाहत होता त्या संधी निर्माण होतील . आजच्या दिवसात आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे . त्यामुळे खर्च करताना विचार करून करा. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

तुळा- राशीसाठी आजचा सोमवार चांगला असून कामाचा किंवा इतर गोष्टीचा जो ताण तुम्हाला होता तो दूर होईल. परंतु यासाठी तुम्हाला संवाद साधणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये मतभेद होण्याचे शक्यता आहे .त्यामुळे परिस्थिती शांतपणे हाताळा. कोणत्या गोष्टींमध्ये अति घाई करू नका विचारपूर्वक निर्णय. गुंतवणूक करायची असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.

वृश्चिक- राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. घरात छोट्या कारणावरून वाद होण्याची शक्यता असून शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. कामकाजात संयम ठेवा, दिवसाच्या शेवटी दिलासा मिळेल.

धनु राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश मिळेल आणि नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी वेळ योग्य आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तसेच प्रवासाचे योग असून तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

मकर- राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. आज कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या जास्त राहतील, त्यामुळे दिवस धावपळीचा जाईल. मात्र तुम्ही केलेली मेहनत वरिष्ठांच्या लक्षात येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, थकवा किंवा अंगदुखी जाणवू शकते.

कुंभ- राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरीत बदलाची शक्यता असून नवीन संधी मिळू शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि काही महत्त्वाची कामं मार्गी लागतील. दिवसभर मन प्रसन्न राहील.

आजचा दिवस थोडा चढ-उताराचा ठरू शकतो. सकाळपासून काही कामं रखडण्याची शक्यता असून ऑफिसमध्ये गोंधळ किंवा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा, अचानक खर्च वाढू शकतो. घरातील व्यक्तींशी बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर वाद होण्याची शक्यता आहे. मात्र संध्याकाळपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group