आजचा बुधवार तुमच्यासाठी ठरणार 'लाभदायक' की 'संघर्षाचा'? जाणून घ्या तुमची राशी काय सांगते!
आजचा बुधवार तुमच्यासाठी ठरणार 'लाभदायक' की 'संघर्षाचा'? जाणून घ्या तुमची राशी काय सांगते!
img
नितीशा कुलकर्णी






कसा आसणार आहे तुमचा आजचा दिवस. तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागणार की एखादी आनंदाची वार्ता मिळणार जाणून घ्या आजचा बूधवार कसा असणार आहे तुमच्या राशीसाठी.

मेष

मेष राशीसाठी आजचा दिवस कधी खुशी, तर कधी गम अशा पद्धतीचा असणार आहे. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. काही अडचणींचा सामना करावा लागेल; परंतु यावर तुम्ही मात कराल. कोणत्याही गोष्टीचा अति विचार करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस ठीक असेल. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खर्च टाळा. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका, विशेषतः खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आणि कामात सकारात्मक प्रगती होईल.

मिथुन 

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. प्रवासाचा योग असून तो लाभदायक ठरू शकतो. मित्रांकडून सहकार्य आणि मदत मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पाऊल उचला.

कर्क

कर्क राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडा मानसिक तणाव जाणवू शकतो. कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया न देता शांत राहून निर्णय घ्या. आर्थिक स्थिती स्थिर राहील; मात्र अनावश्यक खर्च टाळणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी संयम ठेवल्यास दिवस सकारात्मक जाईल.

५) सिंह राशीसाठी आजचा दिवस चांगला असून आज आत्मविश्वास वाढलेला दिसेल. त्यामुळे कामात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकतो, तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मात्र कोणत्याही वादात पडणे टाळा; कारण गैरसमज वाढू शकतात. शांत आणि संयमी भूमिका घेतल्यास दिवस उत्तम जाईल.

कन्या 

कन्या राशीसाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. ऑफिस किंवा व्यवसायात कामाचा ताण वाढू शकतो; मात्र तुमची मेहनत वाया जाणार नाही. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत दिवस सकारात्मक आहे. तसेच आज नवीन लोकांशी ओळख वाढेल आणि भविष्यात उपयोगी ठरणारे संपर्क तयार होतील.

तूळ

आज तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल असून काही दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा ताण असला तरी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील. अचानक धनलाभ किंवा थांबलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांनी आज संयम ठेवण्याची गरज आहे. घरातील काही विषयांवरून मतभेद होण्याची शक्यता असून बोलताना शब्द जपून वापरा. छोट्या गोष्टींमुळे गैरसमज वाढू शकतात. कामाच्या ठिकाणीही थोडा ताण जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्यांना बदलाचा विचार मनात येऊ शकतो; मात्र कोणताही निर्णय घाईत घेऊ नका.

धनु 
धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच कामात उत्साह राहील. काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये यश मिळू शकते. प्रवासाचा योग असून तो कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणासाठी असू शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल असून अभ्यासात मन लागेल आणि अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता आहे. १०) मकर राशीच्या लोकांना कामात स्थिरता जाणवेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. मिळकतीचे मार्ग वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात एखादी शुभ बातमी मिळू शकते; मात्र आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक जाण्याची शक्यता आहे. नवीन योजना किंवा नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मित्रांचा चांगला सहवास लाभेल आणि महत्त्वाच्या कामात सहकार्य मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. एकूणच मन प्रसन्न राहील आणि दिवस आनंदात जाईल.

मीन 

मीन राशीच्या लोकांचे मन शांत राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल आणि यश मिळू शकते. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. तसेच घरातील वातावरणही सकारात्मक राहील; मात्र भावनिक निर्णय टाळून व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group