आज 23 जुलै बुधवार रोजी चातुर्मासातील पहिली शिवरात्री आहे. आजच्या दिवशी काही राशींवर भगवान शिवाची कृपा बरसताना दिसेल. आजच्या दिवशी महादेवाची पूजा करणे सर्वांसाठी लाभदायक ठरणार आहे. तर काही राशींना आज मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. तुमची राशी काय सांगते? आजच्या दिवसात काय होणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य...
मेष - सरकारी कामात नियम पाळा
आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना कामामुळे इतर गोष्टींकडे लक्ष देता येणार नाही. त्यामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात. सरकारी कामात नियम पाळा. व्यवस्थित लक्ष द्या नाहीतर अडकू शकता. आज महत्त्वाच्या कामांची लिस्ट बनवणे चांगले राहील. आज तुमचे भाग्य 89% तुमच्या बाजूने आहे. तुळशीला नियमित पाणी अर्पण करा आणि दिवा लावा.
वृषभ - मालमत्ता खरेदी कराल
आजचा दिवस तुमच्या व्यवसायासाठी चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन गोष्टी जोडल्यास तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमची मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. ऑफिसमध्ये तुम्ही लोकांचे लक्ष वेधून घ्याल. अडचणीच्या परिस्थितीतही रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमचे भाग्य 94% तुमच्या बाजूने आहे. लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवा.
मिथुन - अनोळखी लोकांपासून सावध राहा
आज कोणताही कामात निष्काळजीपणा करू नका. मोठी चूक होऊ शकते. अनोळखी लोकांपासून सावध राहा. ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. मेहनत करा तरच काम पूर्ण होईल. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होईल. आज तुमचे भाग्य 63% तुमच्या बाजूने आहे. गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या.
कर्क - शत्रूंना हरवाल
आज पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. हुशारीने शत्रूंना हरवाल. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. प्रवासात महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमची जुनी चूक उघडकीस येऊ शकते त्यामुळे माफी मागावी लागेल. आज तुमचे भाग्य 65% तुमच्या बाजूने आहे. गणपती बाप्पाला लाडूचा नैवेद्य दाखवा.
सिंह - धार्मिक कार्यात सहभागी व्हाल
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आहे. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ऑफिसमध्ये लोक तुमच्यावर घायाळ होतील. भौतिक गोष्टी वाढतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कामात चांगले प्रदर्शन कराल. मन आनंदी राहील. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेले काम पूर्ण होईल. आज तुमचे भाग्य 72% तुमच्या बाजूने आहे. शिव चालीसा वाचा.
कन्या - चांगली बातमी मिळेल
आज सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. तुम्ही कोणतीही अडचण न घेता कामात पुढे जाल. कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका नुकसान होऊ शकते. आज तुमचे भाग्य 75% तुमच्या बाजूने आहे. सरस्वती मातेची पूजा करा.
तूळ - मान-सन्मान वाढेल
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. काही महत्वाच्या प्रतिष्ठित लोकांशी भेट होईल. कुटुंबातील संबंध सुधारतील. मान-सन्मान वाढल्याने आनंदी राहाल. कोणाकडून मदत मागितल्यास ती सहज मिळेल. आज तुमचे भाग्य 82% तुमच्या बाजूने आहे. पांढऱ्या वस्तूचे दान करा.
वृश्चिक - लोकांचा विश्वास जिंकाल
आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा दिवस आहे. भागीदारीत केलेले काम चांगले राहील. काही नवीन कामे सुरू करू शकता. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही लोकांचा विश्वास जिंकाल. महत्त्वाचे ध्येय पूर्ण न झाल्याने अडचणी येतील. आज तुमचे भाग्य 62% तुमच्या बाजूने आहे. कृष्णाला लोणी-मिश्रीचा नैवेद्य दाखवा.
धनु - पैसे उधार घेणे टाळा
आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा आहे. लोकांकडून पैसे उधार घेणे टाळा. विदेशातून व्यापार करत असाल तर चांगला नफा मिळू शकतो. आपल्या माणसांना आनंद देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. बजेट बनवल्यास, भविष्यासाठी पैसे वाचवू शकाल. आज तुमचे भाग्य 63% तुमच्या बाजूने आहे. पहिली पोळी गायीला खाऊ घाला.
मकर - फुकटचा सल्ला देऊ नका
आज तुमच्या प्रतिथेत वाढ होईल. पैशाचे काही व्यवहार तुमच्या बाजूने होतील. कामासाठी काही महत्वाच्या योजना आखाव्या लागतील. मित्रांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. न मागता कोणालाही सल्ला देऊ नका. मुलांना जबाबदारी दिल्यास ते ती पूर्ण करतील. आज तुमचे भाग्य 88% तुमच्या बाजूने आहे. योग प्राणायाम करा.
कुंभ - मालमत्ता मिळण्याची शक्यता
आज तुम्हाला चांगली मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू असल्यास, त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. व्यापार करणारे लोक त्यांच्या काही योजना पुन्हा सुरू करतील. तुम्हाला मोठ्या लोकांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज तुमचे मन आनंदी राहील, कारण तुम्हाला ऑफिस मध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचे भाग्य 76% तुमच्या बाजूने आहे. गरजूंना तांदळाचे दान करा.
मीन - बिझनेसमध्ये नफा होईल
आज तुम्हाला नशिबाची साथ लाभणार आहे. ऑफिस मध्ये तुम्ही सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊ शकता किंवा प्रवासाला जाऊ शकता. व्यापारामध्ये जास्त नफा झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुमचे भाग्य 91% तुमच्या बाजूने आहे. शिवजप माळ करा.