मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा गडबडीचा असू शकतो. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. आज पैशाचे काही व्यवहार रखडू शकतात. तुमच्या कुटुंबातील भाऊ-बहिणी तुम्हाला मदत करतील. त्यामुळे तुमची अडचण दूर होईल.
वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारे जाईल. तुमचा व्यवसाय थोडा त्रासदायक असू शकतो. पण तुम्हाला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादात तुम्हाला विजय मिळेल.
मिथुन : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. तुम्हाला समाजसेवेचे काम करण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला शारीरिक त्रास असेल तर तो कमी होऊ शकतो. तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि विचारशक्तीने योग्य निर्णय घ्याल. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल.
कर्क : आज तुमची तब्येत थोडी नाजूक राहू शकते. बाहेरचे अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. आज कोणीतरी तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतं. त्यामुळे कोणाचंही ऐकू नका. बिझनेस मध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.
सिंह : आज तुम्ही टीम लीडर म्हणून चांगले काम कराल. तुमच्या प्रेमजीवनातील अडचणी आज दूर होतील. तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही नवीन काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. बिझनेसमध्ये चांगली डील झाल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
कन्या : आज पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे.ऑफिसमध्ये तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला महत्त्वाच्या डिस्कशन मध्ये भाग घ्यावा लागू शकतो. पैशाचे व्यवहार क्लिअर ठेवा. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. नाहीतर तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो.
तूळ : आजचा दिवस विचारपूर्वक पुढे जाण्याचा आहे.विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगले मार्ग मिळतील. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुमचे मित्र तुम्हाला भेटायला येऊ शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही टेन्शन असेल तर ते कमी होईल.
वृश्चिक : आजचा दिवस खास आहे. नवीन प्रॉपर्टी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील समस्या सुटतील. पर्सनल गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. नवीन कामात इंटरेस्ट दाखवल्यास तुम्हाला नक्की यश मिळेल. आज एखादे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्याने तुम्ही खुश व्हाल.
धनु : व्यापार करारा संबंधी चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक संबंधात सुधारणा होईल. तुमचे रखडलेले काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल. कामामध्ये रिस्क घेणे टाळा. नाहीतर नंतर त्रास होऊ शकतो.
मकर : आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे. जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते नक्की पूर्ण करा. विद्यार्थ्यांसाठी नवीन गोष्टी शिकणे चांगले राहील. तुम्हाला एखादी आवडती वस्तू मिळू शकते. तुम्ही तुमच्या घरातील लोकांबरोबर एखाद्या समस्येवर चर्चा करू शकता.
कुंभ : आजचा दिवस जबाबदारीने काम करण्याचा आहे. तुमच्या काही योजना पूर्ण होतील. नवीन गोष्टी शिकायला मिळतील. वैयक्तिक गोष्टींमध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या बोलण्याने तुम्हाला समाजात मान मिळेल. जर तुम्ही तुमच्या मुलांना जबाबदारी दिली तर ते ती व्यवस्थित पार पाडतील.
मिन : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असणार आहे. तुमचा खर्च वाढल्यामुळे तुम्ही टेन्शन मध्ये येऊ शकता. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. विदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत केल्याने तुम्हाला फायदा होईल.