आज 5 जुलै शनिवार रोजी सर्व राशींवर शनी देवाची कृपा राहणार आहे. आजच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही राशींना आज भावनिक होऊन निर्णय न घेण्याचा सल्ला दिला जातोय. तर आजच्या दिवशी काही राशीच्या संपत्तीत वाढ होताना दिसतेय. तुमच्या आजच्या भविष्यात काय लिहिलेय जाणून घ्यायचे असेल तर पहा तुमची राशी काय सांगते ? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया आजचे राशिभविष्य.
मेष : भावनिक होऊन निर्णय घेऊ नका
आज तुम्ही विचारपूर्वक पुढे गेल्यास तुमच्यासाठी चांगले राहील. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. जराही निष्काळजीपणा करू नका अन्यथा ती मोठी समस्या बनू शकते. अचानक आलेल्या एखाद्या बातमीमुळे तुम्हाला प्रवासाला जावे लागू शकते. जर तुम्ही खूप दिवसांपासून चिंतेत असाल तर ती चिंता दूर होईल. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. आज तुमचे भाग्य ८१% तुमच्या बाजूने असेल. गरजूंना तांदूळ दान करा.
वृषभ : संपत्तीत वाढ होईल
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. मित्रांसोबतच्या संबंधात काही समस्या असतील तर त्या दूर होतील आणि जवळीक वाढेल. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांनी काही जबाबदाऱ्या दिल्यास त्या नक्कीच पूर्ण करा. तुम्ही मित्राच्या घरी पार्टीला जाऊ शकता. नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन तुम्ही सहज पूर्ण करू शकाल. विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा कोणीतरी तुम्हाला फसवू शकते. आज तुमचे भाग्य ८९% तुमच्या बाजूने असेल. 'शिव जप माळे'चा जप करा.
मिथुन : जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर आहे. खर्चाचे बजेट तयार करणे चांगले राहील. प्रत्येक काम वेळेवर करा त्यामुळे ते पूर्ण होईल. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. थोडा वेळ आपल्या आई-वडिलांच्या सेवेत घालवा. कुटुंबातील सदस्याला तुमच्या इच्छा सांगा. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुमचे भाग्य ६५% तुमच्या बाजूने असेल. तुळशीला पाणी अर्पण करा.
कर्क : उत्पन्नात वाढ होईल
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे. कामातील अडथळे दूर होतील आणि तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कोणाच्या तरी सल्ल्याने तुम्हाला चांगले नाव कमावण्याची संधी मिळेल. परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीसोबत एखादे काम करण्याचा प्लॅन आखत असाल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुमचे भाग्य ७२% तुमच्या बाजूने असेल. लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवा.
सिंह : व्यवहार करताना सावध रहा
आजचा दिवस तुमच्यासाठी खास फलदायी आहे. घरातील काही बाबतीत सावध राहा आणि कोणत्याही वादात पडू नका. मालमत्तेचा व्यवहार करत असाल तर सर्व बाजू तपासून घ्या. तुमच्या घरातील व्यक्ती तुमच्या कामात सहकार्य करू शकतात त्यामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. नवीन काम करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुमच्या मनातली इच्छा तुम्ही आई-वडिलांना सांगू शकता. आज तुमचे भाग्य ८६% तुमच्या बाजूने असेल. गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या.
कन्या : करिअरमधील समस्या सुटू शकतात
आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळलेला असू शकतो. तुम्ही बंधुभाव वाढवण्यावर भर द्याल. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांना चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. करिअरमधील समस्या आज सुटू शकतात. तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही भावा-बहिणींच्या नात्यावर अधिक लक्ष द्याल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुमचे भाग्य ६६% तुमच्या बाजूने असेल. पार्वती किंवा उमा देवीची पूजा करा.
तूळ : नातेसंबंध घट्ट होतील
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी आहे. कुटुंबातील सदस्यांमधील मतभेद दूर होतील आणि सगळेजण एकत्र मजा करतील. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. काही महत्त्वाच्या विषयांवर तुम्हाला मोठ्या लोकांच्या सल्ल्याची गरज भासेल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक त्यांचे पैसे चांगल्या योजनांमध्ये गुंतवू शकतात. काही वैयक्तिक बाबींमध्ये तुम्हाला बाहेरील लोकांपासून दूर राहावे लागेल. आज तुमचे भाग्य ९८% तुमच्या बाजूने असेल. गरीब लोकांना अन्नदान करा.
वृश्चिक : पैसे गुंतवणे टाळा
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी आहे. तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल त्यामुळे घरात छोटीशी पार्टी आयोजित करू शकता. ऑफिसमध्ये तुम्ही चांगले काम कराल. कोणतेही काम लवकर करण्याची सवय तुम्हाला फायदा देईल. जर तुम्ही मित्रांकडून गुंतवणुकीच्या योजनांबद्दल ऐकले असेल तर त्यात पैसे गुंतवणे टाळा अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आज तुमचे भाग्य ७७% तुमच्या बाजूने असेल. 'संकटनाशन गणेश स्तोत्रा'चे दररोज पठण करा.
धनु : आर्थिक व्यवहारात खूप सावध राहा
आज तुम्हाला परदेशात राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक व्यवहारात खूप सावध राहा. लोकांपासून सावध राहा कारण ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमच्या बोलण्यात नम्रता ठेवा त्यामुळे तुम्ही लोकांकडून सहजपणे काम करून घेऊ शकाल. जर तुम्ही कोणाला व्यवसायात भागीदार बनवण्याचा विचार करत असाल तर त्याच्याबद्दल चांगली माहिती घ्या. तुम्हाला जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. आज तुमचे भाग्य ७३% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
मकर : प्रमोशन मिळू शकते
आजचा दिवस तुमच्यासाठी अडचणी घेऊन येऊ शकतो. अधिकाऱ्यांचा सल्ला मानल्यास तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांची इच्छा आज पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी बनवलेल्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळेल. मुलांच्या करिअरची चिंता दूर होईल. तुम्ही तुमचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहाल. स्वतःसाठी ध्येय निश्चित करणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमचे भाग्य ६९% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.
कुंभ : मन अस्वस्थ राहील
आजचा दिवस तुमचा मान-सन्मान वाढवणारा आहे. सरकारी कामात विचारपूर्वक पुढे जा. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडून तुम्ही मोठ्या लोकांकडून वाहवाही मिळवू शकता. तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करा. जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा अन्यथा तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटाच्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त होऊ शक ज्यामुळे तुमचे मन अस्वस्थ राहील. काही जवळच्या लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुमचे भाग्य ६४% तुमच्या बाजूने असेल. श्री शिव चालीसाचे पठण करा.
मीन : नशीब साथ देईल
मीन राशीच्या लोकांना आज नवीन ओळखींमुळे चांगला फायदा होईल आणि नशीब त्यांना साथ देईल. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या चांगल्या विचारांचा फायदा घ्याल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. पूर्वी केलेल्या चुकीतून आज तुम्हाला धडा घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण विश्वास दाखवा. कामाच्या ठिकाणी अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुमचे भाग्य ७४% तुमच्या बाजूने असेल. गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा.