आजचा शुक्रवार खास ...! तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य जाणून घ्या
आजचा शुक्रवार खास ...! तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
 आज 11 जुलै शुक्रवार रोजी सर्व राशींवर देवी लक्ष्मीची कृपा राहणार आहे. आजच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करणे फायदेशीर ठरेल. काही राशींना आज व्यवसायात मान सन्मान मिळणार असल्याचे दिसतेय. तर आजच्या दिवशी काही राशीना आज मेहनत करण्याचा सल्ला दिला जातोय. तुमच्या आजच्या भविष्यात काय लिहिलेय जाणून घ्यायचे असेल तर पहा तुमची राशी काय सांगते ? चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया आजचे राशिभविष्य.
 
मेष : बिझनेसमध्ये नफा होईल

आजचा दिवस चांगला जाईल. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये मोठा नफा मिळू शकतो मात्र यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. एक्स्ट्रा काम केल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. जॉब करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे. आज नशीब तुमच्या बाजूने ७४% आहे. गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा.

वृषभ : मन प्रसन्न राहील

आज तुमची तुमच्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते ज्यांच्यासोबत तुम्हाला प्रगती करण्याची संधी मिळू शकते. ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकेल ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. बिझनेस करणाऱ्या लोकांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आज नशीब तुमच्या बाजूने ६४% आहे. श्री शिव चालीसा वाचा.

मिथुन : बिझनेस मध्ये चढ उतार येतील

बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चढ उताराचा असेल. जर तुम्हाला कोणाला पैसे उधार द्यायचे असतील तर विचार न करता कोणालाही पैसे उधार देऊ नका नाहीतर तुम्हाला ते परत मिळवण्यासाठी त्रास होऊ शकते. विद्यार्थी त्यांचे काम वेळेवर पूर्ण करतील आणि त्यांच्या भविष्या बद्दल विचार करतील. आज मन प्रसन्न राहील. तुमच्या बाजूने नशीब ६९% आहे. भगवान विष्णूची पूजा करा.

कर्क : आरोग्य एकदम फिट राहील

आज धनु राशीच्या लोकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तुमचे आरोग्य एकदम फिट राहील. जर तुम्ही सोशल वर्क करत असाल तर लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील ज्यामुळे तुम्हाला प्राऊड फील होईल. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा प्लॅन करू शकता. आज सिंगल लोकांना कोणीतरी स्पेशल व्यक्ती भेटू शकते. आज नशीब तुमच्या बाजूने ७३% आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करा.

सिंह : गुड न्यूज मिळू शकते

आजचा दिवस चांगला जाईल. जे लोक जॉब करत आहेत त्यांना आज गुड न्यूज मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रेयसी सोबत लाईफ एंजॉय कराल आणि त्यांच्यासोबत बाहेर फिरायला सुद्धा जाऊ शकता. जर तुम्ही आज मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाऊन गरीब लोकांना मदत केली तर तुम्हाला पुण्य मिळेल, ज्यामुळे तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आज तुमचा बिझनेस ठीक राहील . आज नशीब तुमच्या बाजूने ७७% आहे. संकटनाशन गणेश स्तोत्राचे रोज वाचन करा.

कन्या : जबाबदारीचे काम मिळू शकते

आजचा दिवस खूप चांगला जाईल. जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज वेळेवर पूर्ण होईल. राजकारणात असलेल्या लोकांना आज जबाबदारीचे काम मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनात खूप चांगले संबंध राहतील. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनर सोबत आनंदी जीवन जगाल आणि तुमच्या घरात खूप सुख येईल. आज नशीब तुमच्या बाजूने ९८% आहे. गरीब लोकांना जेवण द्या.

तूळ : आरोग्याची काळजी घ्या

आज तुमच्या बिझनेस मध्ये प्रॉफिट होऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. फुफ्फुसांसंबंधी काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. खूप दिवसांपासून रखडले काम आज पूर्ण होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. जर पैसे, व्यापार किंवा मालमत्ते संबंधित कोणतीही केस कोर्टात अडकली असेल तर तो सुद्धा आज सॉल्व होऊ शकतो. तुम्ही तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम करू शकता ज्यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आज नशीब तुमच्या बाजूने ६६% आहे. पार्वती किंवा उमा देवीची पूजा करा.

वृश्चिक : पगारवाढ होऊ शकते

आजचा दिवस थोडा त्रासदाय राहील. तुम्ही थोडे टेन्शन मध्ये असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मन लावून अभ्यास करतील. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर पास होण्यासाठी तुम्हाला खूप हार्ड वर्क करावे लागेल. ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांना योग्य जोडीदार शोधायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला अजून थोडी वाट पाहावी लागेल. पगारवाढ होऊ शकते. आज तुमच्या बाजूने ८६% नशीब आहे. गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या.

धनु : पैसे उधार देऊ नका

आजचा दिवस चांगला जाईल. आज कोणालाही काहीही चुकीचे बोलू नका नाहीतर तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. तुम्ही कोणत्याही भांडणात पडू नका. जर तुम्हाला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर विचारपूर्वक पैसे गुंतवा. तुम्हाला नुकसान सुद्धा होऊ शकते. जर आज कोणी तुमच्याकडे पैसे उधार मागायला आले तर कोणालाही पैसे उधार देऊ नका नाहीतर तुमचे पैसे अडकू शकतात आणि तो माणूस तुम्हाला तुमचे पैसे परत देण्यासाठी त्रास देऊ शकतो. आज नशीब तुमच्या बाजूने ७२% आहे. लक्ष्मी मातेला खीरचा नैवेद्य दाखवा.

मकर : मोठे पद मिळू शकते

जे लोक राजकारणात आहेत त्यांना आज मोठी जबाबदारी किंवा मोठे पद मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचा व्यवसाय खूप चांगला चालेल. छोट्या व्यावसायिकांना सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला बिझनेस मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकते. आज नशीब तुमच्या बाजूने ६५% आहे. तुळशीला नियमित जल अर्पण करा आणि दिवा लावा.

कुंभ : मेहनत करत राहा

आजचा दिवस खूप चांगला जाईल. तुम्हाला जे काही मिळवायचे आहे ते तुम्ही मिळवू शकाल. फक्त मेहनत करत राहा. तुमच्या कुटुंबातील लोकांचे तुमच्याशी चांगले वागणे राहील, त्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदेल. तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत बाहेर फिरायला जाऊ शकता आणि तुमच्या भावना व्यक्त करू शकता. तुम्ही तुमच्या मनातले तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगाल आणि ते तुम्हाला समजून घेतील. आज नशीब तुमच्या बाजूने ८९% आहे. शिव जाप माळ जप करा.

मीन : व्यवसाय चांगला चालेल

आज तुम्ही एखाद्या गोष्टीवर विचार करत असाल आणि निर्णय घ्यायचा असेल तर कोणाचा सल्ला घेऊ नका. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय खूप वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी जीवन जगाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आज नशीब तुमच्या बाजूने ८१% आहे. गरजूंना तांदूळ दान करा.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group