आजचा मंगळवार खास ...! मेष ते मीन सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य वाचा
आजचा मंगळवार खास ...! मेष ते मीन सर्व १२ राशींचे आजचे राशिभविष्य वाचा
img
Dipali Ghadwaje
आज 1 जुलै मंगळवार रोजी सर्व राशींवर हनुमानजींचा आशीर्वाद राहणार आहे. काही राशींसाठी आजचा दिवस शुभ असेल तर काहींसाठी समस्या निर्माण करणारा असेल. काही राशींचे आज पैसे बुडतील. काही राशींचा मानसिक ताण वाढेल. तर आजच्या दिवशी काही राशी आपल्या कामात यशस्वी होताना दिसत आहेत. तुमची राशी काय सांगते?आजच्या दिवसात काय होणार? तुम्हाला कोणत्या बाबतीत सतर्क रहावे लागणार कोणते उपाय केल्याने लाभ होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी पहा मेष ते मीन सर्व राशींचे आजचे राशिभविष्य...
 
मेष - स्वप्न पूर्ण होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहिल. बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल. तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. व्यवसायात उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. नफा मिळेल. भावंडांकडून चांगला सल्ला मिळेल. नातेवाईकांसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्याला जल अर्पण करा.

वृषभ - महत्त्वाचा निर्णय घ्याल

आजचा दिवस खर्चाने भरलेला राहिल. कामाच्या ठिकाणी निष्काळजी राहाल. तुम्हाला खूप मोठे परिणाम भोगावे लागतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर भावंडांशी सल्लामसलत करा. तब्येत अचानक बिघडू शकते. थकवा जाणवेल. आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

मिथुन - आर्थिक लाभ होतील

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी राहिल. मनाच्या चंचलेतवर नियंत्रण ठेवा. प्रेम जीवनात बदल होतील. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसतील. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात रुची वाढेल. आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे कपडे दान करा.

कर्क - काम रखडेल

आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहिल. कुटुंबातील सदस्यांशी नीट बोला. अन्यथा गैरफायदा घेतला जाईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. जोडीदारासोबत दैनंदिन गरजांविषयी चर्चा कराल. कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.

सिंह - बोलण्यात गोडवा ठेवा

आज तुमच्या धैर्यात वाढ होईल. नोकरीशी संबंधित लोकांना नवीन काम सोपवल जाईल. सहकाऱ्यांसोबत काम सोपवले जाईल. बोलण्यात गोडवा ठेवा. जोडीदारासोबत बाहेर जाल. इच्छा पूर्ण होतील. आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा.

कन्या - चिडचिडेपणा वाढेल

आज तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विनाकारण चिंतेत असाल. तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा राहिल. संवाद कमी राहिल. प्राणायम करुन ताण कमी करु शकता. बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. वाहन जपून चालवा. मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा

तूळ - मानसिक ताण राहिल

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. शैक्षणिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराशी कुटुंबाची ओळख करुन द्याल. सामाजिक स्तरावरही चांगले परिणाम मिळतील. नवीन काम करताना वडिलांचा सल्ला घ्या. मानसिक तणाव राहिल. आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायामचा अभ्यास करा

वृश्चिक - सावध राहा.

आज तुम्हाला आजूबाजूच्या विरोधकांपासून सावध राहवे लागेल. काही प्रतिकूल बातम्याना सामोरे जावे लागेल. अचानक प्रवास घडेल. पैशांचे व्यवहार करण्यापूर्वी सावध राहा. अडचणींना सामोरे जावे लागेल. अधिकाऱ्यांशी बोलताना चुकीचा शब्द वापरु नका. अधिकाऱ्याशी वाद होऊ शकतो. आज भाग्य ८३ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा.

धनु - सहकार्य मिळेल

आज तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही आनंदी असाल. गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मुलांची प्रगती पाहून आनंदी व्हाल. घरात वाद होऊ शकतात. मित्रांसोबत फिरायला जाल. आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

मकर - समस्या येतील

आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. सामाजिक स्तरावर नकारात्मक परिणाम मिळेल. मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. अनोळखी व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. परदेशातून आयात-निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल. समस्यांना सामोरे जावे लागेल. आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणाचा पाठ करा.

कुंभ - पैसे बुडतील

राजकारणातील लोकांना आजचा दिवस चांगला असेल. धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्याल. मानसिक शांतता मिळेल. आर्थिक बाबी विस्कळतील. कोणतेही काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. नवीन मालमत्ता खरेदी कराल. गुंतवणुकीतून पैसे बुडू शकतात. आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

मीन- वाद मिटेल

आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने चांगला असेल. नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळेल. सामाजिक स्तरावर लोकांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत सुरु असलेला वाद सुटेल. नातेवाईकांना भेटाल. मुलांची प्रगती पाहून आनंद वाटेल. आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीगणेश चालीसाचे पठण करा.

इतर बातम्या
Join Whatsapp Group