सावधान! सिंह राशीत चंद्र-केतूची युती; 'ग्रहण योगा'मुळे 'या' ३ राशींच्या अडचणी वाढणार, तुमची रास यात नाही ना?
सावधान! सिंह राशीत चंद्र-केतूची युती; 'ग्रहण योगा'मुळे 'या' ३ राशींच्या अडचणी वाढणार, तुमची रास यात नाही ना?
img
नितीशा कुलकर्णी






ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची युती मानवी जीवनावर आणि मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम करत असते. उद्या, 25 एप्रिल 2026 रोजी रात्री 08:04 मिनिटांनी चंद्र देव सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे सिंह राशीत आधीपासूनच केतु विराजमान आहेत.

जेव्हा चंद्र आणि केतु एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा 'ग्रहण योग' निर्माण होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, तर केतु हा विच्छेद आणि संभ्रमाचा ग्रह आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो आणि विनाकारण भीती किंवा अस्वस्थता जाणवू लागते. हा योग 25 एप्रिलच्या रात्रीपासून पुढील दोन दिवस सक्रिय राहील.

सिंह - मानसिक अस्वस्थता: हा योग तुमच्याच राशीत तयार होत असल्याने तुम्हाला त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विनाकारण चिडचिड होणे किंवा डोकेदुखीसारखे त्रास जाणवू शकतात. या काळात कोणतेही मोठे आर्थिक किंवा वैयक्तिक निर्णय घेणे टाळावे.

मेष - कामात अडथळे: मेष राशीच्या जातकांसाठी हा योग पंचम भावात तयार होत आहे. यामुळे प्रेमसंबंधात दुरावा किंवा मुलांच्या आरोग्याविषयी चिंता सतावू शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता राखण्यासाठी प्रयत्न करावेत, कारण मन विचलित होण्याची शक्यता आहे.

मीन - गुप्त शत्रूंचा त्रास: मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक असू शकतो. जुन्या व्याधी पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुमच्याविरुद्ध कटकारस्थान करू शकतात, त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.

आर्थिक जोखीम टाळा: या 3 राशींच्या जातकांनी 25 आणि 26 एप्रिल रोजी कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक किंवा पैशांची देवाणघेवाण टाळावी. या काळात दिलेले पैसे अडकण्याची किंवा चुकीच्या जागी गुंतवणूक होण्याची शक्यता अधिक असते.

नात्यांमध्ये तणाव: चंद्र-केतुच्या या युतीमुळे संवादामध्ये स्पष्टतेचा अभाव जाणवेल. जोडीदारासोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊन वाद होऊ शकतात. शांत राहणे आणि वादावर पडदा टाकणे हाच या काळात सर्वोत्तम मार्ग असेल. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group