ज्योतिष शास्त्रानुसार, आज म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजून 14 मिनिटांनी चंद्र ग्रह मिथुन राशीतून आपल्या स्वराशीत म्हणजेच कर्क राशीत संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा सर्व राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे. काही राशींसाठी हे संक्रमण शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. मात्र, या ठिकाणी आपण कोणत्या राशींना चंद्राच्या संक्रमणाचा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
चंद्राच्या संक्रमणाने 3 राशींच्या जीवनात आनंद येणार आहे. या राशींच्या करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, बिझनेसमध्ये देखील चांगला लाभ मिळेल. त्याचबरोबर धनलाभाचेही योग जुळून येणार आहेत. त्यामुळे या भाग्यशाली राशींविषयी जाणून घेऊयात.
मिथुन रास :
मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्राचं संक्रमण गेमचेंजर ठरणार आहे. या राशीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. जर पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. घरातील वातावरण आनंदी राहील.
कर्क रास :
चंद्राच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव कर्क राशीवरसुद्धा पडमार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. धनप्राप्तीचे योग जुळून येणार आहेत. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. या कालावधीत तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतील.
कन्या रास :
कन्या राशीच्या लोकांना चंद्राच्या संक्रमणाने चांगली शुभवार्ता मिळेल. तुमच्या व्यवसायात प्रगतीचे योग जुळून येणार आहेत. व्यवसायात तुम्हाला एखादी चांगली डील मिळू शकते. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुमच्या करिअरला नवी दिशा मिळेल. प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होतील.