आरबीआयने आणखी दोन बँकांवर कडक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध कारणांमुळे आरबीएल व युनियन बँक ऑफ इंडियावर दंडात्मक कारवाई केली आहे.
RBI ने युनियन बँक ऑफ इंडियाला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46 (4) (i) आणि 51 (1) सह कलम 47 A (1) (c) च्या तरतुदींनुसार हा दंड ठोठावला आहे. बँकेने काही सूचनांचे पालन न केल्यामुळे युनियन बँक ऑफ इंडियावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
सूचनांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीएल बँक आणि बजाज फायनान्स लिमिटेडवरही दंड ठोठावला आहे. आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
खासगी बँकेला 64 लाखांचा दंड
दुसर्या आदेशात, मध्यवर्ती बँकेने मार्गदर्शक तत्त्वे, 2015 चे पालन न केल्याबद्दल खाजगी क्षेत्रातील RBL बँक लिमिटेडला 64 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.