रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला.
रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ०.२५ टक्क्यांनी म्हणजेच २५ बेसिस पॉईंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानंतर रेपो दर ६.२५ टक्क्यांवर आलाय. पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वीच अनेक तज्ज्ञांनी रेपो दर यावेळी कमी केले जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला होता.
रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आता कर्ज घेणाऱ्यांना आणि ज्यांचं आता गृहकर्ज सुरू आहे अशा ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी माहिती देताना गव्हर्नरांनी महागाई दर हे लक्ष्याच्या जवळ आल्याचं म्हटलंय. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये जीडीपी ग्रोथ ६.७ टक्के राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.