आरबीआयची मोठी कारवाई! HDFC बँकेला तब्बल ७५ लाखांचा दंड ; नेमकं कारण काय?
आरबीआयची मोठी कारवाई! HDFC बँकेला तब्बल ७५ लाखांचा दंड ; नेमकं कारण काय?
img
DB
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एचडीएफसी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. एचडीएफसी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांचे पालन केले नाही. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने सांगितल्याप्रमाणे, HDFC बँकेने केवायसीसंदर्भात काही नियमांचे पालन केले नाही. त्यांच्या गाइडलाइन्सचे पालन केले नाही. त्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीयच्या मते, एचडीएफसी बँकेने काही ग्राहकांना जोखिम श्रेणीनुसार वर्गीकृत केले नाही. ग्राहकांना कमी, मध्यम किंवा उच्च जोखीम या तीन कॅटेगरीत वर्गीकृत करायचे असते. 

तसेच काही ग्राहकांना युनिका आयडेंटिफिकेशन कोड देण्याऐवजी अनेक आयडेंटिफिकेशन कोड दिले आहे. हे आरबीआयच्या गाइडलाइन्समध्ये   बसत नाही.

आरबबीआयने केएलएम अॅक्सिवा फिनवेस्टलादेखील दंड ठोठावला आहे. तब्बल १० लाखांचा दंड आहे. ही एक नॉन डिपॉझिट नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे. या कंपनीने देखील Direction 2023 अंतर्गत डिविडेंटसंबंधित नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे या कंपनीलाही दंड ठोठावण्यात आला आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group