आरबीआयने पतधोरण बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीसीने सलग दहाव्यांदा रेपो रेट स्थिर ठेवले आहे. पतधोरण बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे. शक्तिकांत दास यांनी सांगितले की, पुन्हा एकदा रेपो रेट ६त५ टक्के ठेवण्यात आले आहे.रेपो रेट तसाच राहिल्याने कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो रेट. यामुळे तुमच्या गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जावर कोणताही परिणाम होणार नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील चढ-उतारनंतरही चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यात आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी हे धोरण फायदेशीर ठरले आहे. त्यामुळेच यावर्षीही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला आहे.यामुळे या वर्षी महागाई कमी होण्याची शक्यता आहे.
रेपो रेटमध्ये कपात कधी होणार?
आरबीआयच्या या निर्णयानंतर आता पुढील पतधोरण आढावा बैठकीत रेपो रेट कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महागाई हा खूप चिंतेचा विषय आहे. याचा परिणाम कच्च्या तेलावर आणि वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळे महागाई पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तलली जात आहे.
मागील महिन्यात अमेरिकन फेडरल बँकेने बेंचमार्क दर ०.५ टक्क्यांनी कमी केले आहेत. याशिवाय इतर अनेक देशांनही व्याजदरात कपात केली आहे. परंतु आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.