मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) : ऑनलाइन पेमेंट सेवा देणाऱ्या पेटीएम या देशातील आघाडीच्या कंपनीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) काल केलेल्या कारवाईचा मोठा परिणाम मार्केटच्या सुरुवातीला कंपनीच्या शेअर्सवर झाल्याचे दिसून आले आहे.
अर्थसंकल्पाच्या दिवशी आज शेअर बाजार उघडल्यानंतर पेटीएमचे शेअर्स कोसळले आणि 20 टक्के लोअर सर्किटला धडकले. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, केंद्रीय बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या बँकिंग सेवांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला, त्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये पडझड होण्याची भीती आधीच होती.
पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडचे शेअर्स सकाळी 9.15 वाजता 20 टक्के लोअर सर्किटसह 609 रुपयांवर उघडले आणि ओपनिंगसह शेअरची किंमत 152.20 रुपयांनी पडले व पेटीएम एमसीएप कंपनीचे बाजार भांडवल 38,680 कोटी रुपयांवर घसरले. पेटीएम शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 998.30 रुपये आहे.