२००० रुपयांच्या नोट बदलण्याबाबत
२००० रुपयांच्या नोट बदलण्याबाबत "ही" महत्वाची माहिती आली समोर
img
दैनिक भ्रमर
नवी दिल्ली:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली होती. यासाठी बँकेने लोकांना 4 महिन्यांची मुदत दिली होती. त्याची अंतिम मुदत आज संपत होती. मात्र, आरबीआयने आढावा घेत नोटा बदलून देण्यासाठी मुदत वाढवली आहे. 

उद्यापासून 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे. आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे. 

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता 7 ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 
आरबीआयनुसार, 29 सप्टेंबर 2023 पर्यंत 96 टक्के 2000 च्या नोटा परत आल्या आहेत.
India | RBI |
इतर बातम्या
Join Whatsapp Group